पुलगाव दारुगोळा भांडारात पुन्हा स्फोट, किमान 5 जणांचा मृत्यू झाल्याची भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नागपूर

वर्ध्याजवळील पुलगाव इथल्या दारुगोळा भांडारात आज पुन्हा एकदा स्फोट झाले आहेत. या स्फोटामध्ये ५ जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या स्फोटामध्ये १० जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाञण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. हे स्फोट कशाचे झाले हे अधिकृतरित्या सांगण्यात आलं नसलं तरी दारुगोळ्याची एक पेटी पडल्याने हे स्फोट झाले असावेत असा संशय वर्तवण्यात येत आहे. मृत्यूमुखी पडलेले सगळेजण हे कंत्राटी मजूर असल्याचं सांगण्यात येत आहे.

2016 साली जून महिन्यात याच दारुगोळा भांडारात स्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये लेफ्टनंच कर्नल आर.एस.पवार आणि मेजर मनोज यांच्यासह एकूण 19 जणांचा मृत्यू झाला होता. इथलं दारुगोळा भांडार हे 28 किलोमीटरच्या परिसरात पसरलेलं आहे.