31 ऑक्टोबरला दिसणार ‘ब्ल्यू मून’;अडीच वर्षांनी आला योग

एकाच इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा आल्या तर दुसऱ्या पौर्णिमेला दिसणाऱ्या चंद्राला ‘ब्ल्यू मून’ म्हणतात. यंदा ऑक्टोबर महिन्यात ‘ब्ल्यू मून’ योग होत आहे. ऑक्टोबर महिन्यात दोन पोर्णिमा येत असल्याने हा योग होत आहे. यंदा अधिक महिना असल्याने अधिक अश्विन पोर्णिमा 1 ऑक्टोबरला आहे. तर निज अश्विन पोर्णिमा 31 ऑक्टोबरला आहे. त्यामुळे 31 ऑक्टोबरला एकाच महिन्यात येणारी दुसरी पोर्णिमा आहे. त्यामुळे त्या दिवशी ‘ब्लू मून’ योग होत आहे.

एका महिन्यात एक अमावस्या आणि एक पोर्णिमा असते. मात्र, कधीतरी एकाच महिन्यात दोन पोर्णिमा येतात. असा योग फार क्वचित येतो. असा योग दुर्मिळ असल्याने अशा घटनांचा उल्लेख ‘वन्स इन ब्ल्यू मून’ असा करण्याची पद्धत असल्याने याला ‘ब्ल्यू मून’ योग म्हणातात, अशी माहिती पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. या पोर्णिमेला चंद्र निळा दिसत नसून या योगाला फक्त असे नाव देण्यात आले आहे. सुमारे अडीच ते तीन वर्षात असा योग येतो. यापूर्वी 31 मार्च 2018 रोजी असा योग आला होता. आता यानंतर 31 ऑगस्ट 2023 रोजी ब्ल्यू मून योग येणार आहे, अशी माहितीही सोमण यांनी दिली.

 

आपली प्रतिक्रिया द्या