जागतिक पर्यावरण दिन – कांजूरमार्ग क्षेपणभूमी येथे 16 हजार वृक्षांची लागवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कांजूरमार्ग क्षेपणभूमी येथे 16 हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. महापालिका आणि अँटोनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रिरुट’ या नागरी वन पुनर्स्थापना उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी पार पडणाऱया या मोहिमेत मुंबईकरांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे आणि पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

घनकचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधांचे हरित आणि शाश्वत परिसंस्थेमध्ये रूपांतर करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत
असलेल्या या उपक्रमात कांजूरमार्ग क्षेपणभूमी परिसरात 16 हजार नवीन वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये सातपेक्षा अधिक स्थानिक व पर्यावरणास अनुकूल वृक्षप्रजातींचा समावेश असेल. याठिकाणी आधीपासून अस्तित्वात असलेल्या 12 हजार 800 वनस्पतींसोबत ही वृक्षलागवड करण्यात येणार आहे.