
ज्येष्ठ घटनातज्ञ आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित डॉ. सुभाष सी. कश्यप (97) यांचे आज दिल्लीतील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. डॉ. सुभाष कश्यप यांनी 1953 मध्ये संसद सचिवालयातून कारकीर्द सुरू केली. त्यानंतर सुमारे 37 वर्षे ते संसदेत कार्यरत होते. 1984 ते 1990 या कालावधीत ते लोकसभेचे प्रधान सचिव होते. त्यांनी संसदेच्या कामात दिलेल्या योगदानासाठी 2015 मध्ये त्यांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले होते.



























































