पालिका विद्यार्थ्यांसाठी आणखी 1300 डिजिटल क्लासरूम, शिक्षण विभागाकडून 244 कोटींची तरतूद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डिजिटल युगातील तंत्रज्ञानाचा फायदा अधिकाधिक विद्यार्थ्यांना व्हावा, यासाठी या शैक्षणिक वर्षापासून आणखी 1 हजार 300 डिजिटल वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे तर कमी होणार असून नवीन विषय अधिक जलदगतीने शिकायला मिळणार आहेत. दरम्यान, या डिजिटल वर्गांसाठी शिक्षण विभागाने 244 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

मुंबई महापालिकेच्या 1 हजार 150 शाळांमध्ये चार लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना 27 शालेय वस्तूंचे मोफत वाटप करण्यात येते. त्याचबरोबर काही ठिकाणी मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर महापालिकेने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळा सुरू केल्या आहेत. त्याच धर्तीवर महापालिकेच्या विद्यार्थ्यांना दृश्राव्य माध्यमातून शिक्षण देता यावे यासाठी आणखी 1300 डिजिटल वर्ग सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. हे वर्ग सुरू झाल्यास पालिकेच्या डिजिटल वर्गांची संख्या 2 हजार 600 होणार आहे.

z नव्याने सुरू होणाऱया नवीन वर्गांबाबतची पालिका प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून या विशेष इलेक्ट्रॉनिक फळय़ावर पाठय़पुस्तकांनुसार आवश्यक तो मजकूर, ध्वनिचित्रफितीही उपलब्ध करण्यात आल्या आहेत.