निवृत्ती वेतनधारकांसाठी पालिकेची आज पेन्शन अदालत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

निवृत्ती वेतनधारकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालिकेने 12 मार्च रोजी उच्चस्तरीय पेन्शन अदालतचे आयोजन केले आहे. भायखळा येथील ई-विभाग कार्यालयातील तिसऱ्या मजल्यावर सकाळी 11 वाजता अदालतला सुरुवात होणार आहे. विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी निवृत्ती वेतनधारक पालिकेत सतत खेटे घालत असतात. या प्रकरणाचा न्यायनिवाडा करण्यासाठी पालिका आयुक्तांनी लेखापाल यांची निवड केली.

दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी यानंतर उच्चस्तरीय पेन्शन अदालत सुरू झाली. या अदालतमध्ये प्रमुख लेखापाल (कोषागार) यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख कर्मचारी अधिकारी व उपकायदा अधिकारी यांची त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती पेन्शनधारकांची सर्व गाऱहाणी ऐकून त्यावर कार्यवाही करते. सहाय्यक आयुक्त, खातेप्रमुख, अधिष्ठाता यांच्या स्तरावर ज्या प्रकरणांचे निराकरण झालेले नाही अशाच प्रकरणांचा समावेश अदालतीमध्ये केला आहे. त्यामुळे विहित नमुन्यात अर्ज सादर केलेल्या निवृत्ती वेतनधारकांनी पेन्शन अदालतीमध्ये भाग घ्यावा असे आवाहन पालिकेने केले आहे.