
अयोध्येत पार पडलेल्या राममंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्यानंतर भाविकांनी मोठय़ा प्रमाणात देणग्या देण्यास सुरुवात केली आहे. या देणग्या स्वीकारण्यासाठी उघडण्यात आलेल्या ट्रस्टच्या बँक खात्यातून बनावट चेकद्वारे सहा लाख रुपये लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. लखनौमधील दोन बँकांमध्ये बनावट चेकचा वापरून राम जन्मभूमी ट्रस्टच्या खात्यातून 1 आणि 8 सप्टेंबरला असे दोन वेळा एकूण सहा लाख रुपये काढण्यात आले. तिसऱ्या वेळेस काढण्यात येत असलेली रक्कम मोठी असल्याने बँक कर्मचाऱ्यांनी ट्रस्टचे महासचिक चंपत राय यांच्याकडे मोबाईलवर संपर्क साधून विचारणा केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. अयोध्या पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
























































