
बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान याने मंगळवारी पहाटे वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. सुरक्षा रक्षकांच्या कड्यामध्ये शाहरूख खान हा सोमवारी रात्री उशिरा कटरा इथे पोहोचला होता. आपली ओळख लपविण्यासाठी त्याने आपला चेहरा जॅकेटच्या टोपीने झाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एवढ्या सुरक्षा व्यवस्थेत चाललेली ही व्यक्त कोण आहे हे कळू शकलं नाही.
VIDEO | Bollywood actor @iamsrk visited Mata Vaishno Devi shrine earlier today. pic.twitter.com/HbjW0YczUC
— Press Trust of India (@PTI_News) December 12, 2023
शाहरूख खान याचा ‘डंकी’ हा नवा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या यशासाठी साकडे घालण्यासाठी तो वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आल्याचे बोलले जात आहे. जवान आणि पठाण या चित्रपटांच्या प्रदर्शनापूर्वी त्याने वैष्णोदेवीचे दर्शन घेतले होते. या दोन्ही चित्रपटांनी नवे विक्रम प्रस्थापित करत बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली होती.
























































