
सामना प्रतिनिधी, मुंबई
शिवसेना नेते डॉ. मनोहर जोशी यांच्या ‘प्रशासन’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवार, 2 डिसेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात होणाऱया या समारंभाला केंद्रीय रस्ते व जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
नगरसेवक, मुख्यमंत्री ते लोकसभा अध्यक्ष अशी अनेक महत्त्वाची पदे आणि गेल्या 52 वर्षांच्या राजकीय व सामाजिक निरीक्षणाचे सार या पुस्तकात मांडण्यात आले आहे. 2 डिसेंबरला मनोहर जोशी वयाच्या 82व्या वर्षांत प्रवेश करत आहेत. त्या निमित्ताने या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.





























































