पुण्यात प्रेयसीचा खून करून प्रियकराची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पुणे 

पुण्यात एका तरुणाने आपल्या प्रेयसीचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पुण्यातील सांगवीतील ही घटना आहे. तरुणीचे नाव अदिती बिडवे असून तरुणाचे नाव नेईमोद्दीन शाह आहे. अदितीचे वय १९ होते तर नेईमोद्दीन २१ वर्षाचा होता.

दोघेही मूळचे लातूरचे रहिवासी असून लातूरमध्येच त्यांच्यात प्रेमसंबध जुळले होते. नंतर अदिती शिक्षणासाठी पुण्यात स्थायिक झाली. सांगवीतील आपल्या नातेवाईकांकडे ती राहत होती. पुण्यात आपल्याला नोकरी मिळाली असे कुटुबीयांना सांगून नेईमोद्दीन मंगळवारी सांगवीत पोहोचला.

अदितीच्या घरी कोणी नसताना नेईमोद्दीन तिच्या घरी पोहोचला. घरी पोहोचल्याच्या काही वेळानंतर नेईमोद्दीने अदितीचा खून केला व नंतर सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे दोघांच्या घरच्यांना धक्का बसला आहे. अदितीच्या हत्येचं आणि नेईमूद्दीनच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.