एमआरआय स्कॅनिंग रुममध्ये घेऊन गेला बंदूक, गोळी लागून झाला मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ताकीद देऊनही एका व्यक्तीने मोठी चूक घडली आणि ती त्याच्या जीवावर बेतली. ही व्यक्ती पेशाने वकील होती आणि चुकून बंदूक घेऊन एमआरआय स्कॅनिंग रूममध्ये पोहोचली. तेथे बंदुकीतून गोळीबार झाल्याने त्या व्यक्तीच्या पोटात गोळी लागली, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

लिएंड्रो मॅथियास डी नोव्हस असे या व्यक्तीचे नाव आहे. ब्राझीलमधील साओ पाउलो येथील 40 वर्षीय ही व्यक्ती वकील आहे. 16 जानेवारीला तो आपल्या आईचा एमआयआर करण्यासाठी रुग्णालयात आला होता. त्यावेळी त्याच्या खिशात बंदूक होती. तो रुग्णालयात सांगायला विसरला होता की त्याच्याकडे बंदूक आहे. त्याला त्यावेळी सांगितले होती की, स्कॅनिंग रुममध्ये जाण्यापूर्वी मेटलचे सामान जमा करावे.

इंडिपेंडेंट यूकेच्या वृत्तानुसार, लिएंड्रोचा बंदूक कंबरेवरून खेचले गेले आणि गोळी लागली. त्यात त्याच्या पोटाला गोळी लागली. रुग्णालयात उपचारादरम्यान 6 फेब्रुवारी रोजी त्याचा मृत्यू झाला. तो वकिल व्यवसायाने वकिल असला तरी सोबत बंदुक ठेवायचा. आपल्या टिकटॉक आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करायचा. त्यांचे हजारोच्या संख्येने फॉलोअर्स आहेत. रुग्णालयाच्या प्रवक्त्याने याबाबत सांगितले की, ‘आम्ही यावर जोर देऊ इच्छितो की आमच्या टीमने सर्व नियमांचे पालन केले आहे. रुग्ण आणि सोबत असलेली महिला दोघांनाही त्या कक्षात पोहोचण्याच्या प्रक्रियेबद्दल योग्य सूचना देण्यात आल्या होत्या आणि धातूच्या वस्तू घेऊन जाऊ नयेत अशी ताकीदही देण्यात आली होती. लिएंड्रो आणि त्याची आई दोघांनी प्रोटोकॉलशी संबंधित एका फॉर्मवर स्वाक्षरीही केली, मात्र लिएंड्रोने बंदूकीबाबत काही बोलला नाही आणि त्या रुममध्ये गेला. पोलिसांनी तपास केला असता त्याच्या बंदुुकीची नोंदणी झाली होती आणि त्याच्याकडे वैध परवाना होता.