
किरकोळ वादातून भावाने भावाची हत्या केल्याची घटना मालवणी येथे घडली. जॉय पॉल असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी जोस पॉलला मालवणी पोलिसांनी अटक केली. जॉन आणि जोस यांच्यात गुरुवारी रात्री कडाक्याचे भांडण झाले. हा वाद प्रचंड टोकाला गेला. रागाच्या भरात जोसने जॉयच्या डोक्यावर मारले. डोक्यावर मारल्याने जॉय हा जखमी झाला. आज सकाळी जोस हा जॉयला उठवण्यासाठी गेला होता. मात्र तो उठला नसल्याने याची माहिती मालवणी पोलिसांना दिली. पोलिसांनी जॉयला रुग्णालयात दाखल केले. जॉयच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी जोसविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.


























































