Budget 2022 काय स्वस्त होणार, काय महागणार? वाचा सविस्तर….

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सोमवारी संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर केला. विविध क्षेत्रांसाठी त्यांनी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र या अर्थसंकल्पाचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. त्यामुळे जाणून घ्या काय होणार स्वस्त आणि काय होणार महाग या यादीकडे आपण नजर टाकूया…

काय स्वस्त होणार?

कपडे
मौल्यवान रत्न आणि हिऱ्याचे दागिने (कस्टम ड्यूटी 5 टक्क्यांनी घटवण्यात आली)
शेतीसाठी लागणारे उपकरणे
चप्पल आणि बूट
पॅकिंगसाठी वापरले जाणारे डब्बे
पेट्रोलियम उत्पादनांसाठी लागणारी रसायनं
विदेशातून आयात होणारे मशिन
स्टील स्क्रॅप्स
कॅमेरा लेन्स
मोबाईल फोन, चार्जर
चामड्याच्या वस्तू

Budget 2022 Live Video – करदात्यांची मोठी निराशा, कररचना ‘जैसे थे’

काय महागणार?

आयात होणारे नकली दागिने
विदेशी छत्र्या
कोणतेही मिश्रन नसलेले इंधन
कॅपिटल गुड्स

(भांडवली वस्तूंच्या आयातीवर सूट रद्द करण्यात आली असून 7.5 टक्के आयातशुल्क आकारले जाणार आहे)

करदात्यांची निराशा

अर्थसंकल्पातून करदात्याची मोठी निराशा झाली आहे. केंद्र सरकारने आयकरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. गेल्या सहा वर्षांपासून यात बदल करण्यात आलेला नाही. मात्र केंद्राने कार्पोरेट टॅक्सधारकांना दिलासा दिला असून कर 3 टक्के घटवून 18 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. तसेच आयकर भरला नसेल किंवा भरताना चुका झाल्या असेल तर आगामी वित्तवर्षातही आयकर भरण्याची सूट केंद्राने दिली आहे.

गेल्या वर्षी काय स्वस्त, काय महाग झालं?

गेल्या वर्षी कापूस, सिल्क, प्लास्टिक, लेदर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, ऑटो पार्टस, सोलर प्रोडक्ट, मोबाईल, चार्जर, आयात कपडे, रत्न, एलईडी बल्ब, फ्रिज, एसी आणि दारु स्वस्त झाली होती, तर नायलॉनचे कपडे, लोखंड, स्टील, तांब्याच्या वस्तू, सोने, चांदी आणि प्लॅटिनम महागले होते.