फाशीची शिक्षा रद्द करण्याची विनंती, नऊ खटल्यांची आजपासून सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-highcourt

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्यातील विविध घटनांमध्ये बलात्कार, बॉम्बस्फोट, ऑसिडहल्ला आणि हत्या करणाऱ्या आरोपींना सत्र न्यायालयांनी फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेला आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असून फाशीची शिक्षा रद्द करण्याची विनंती त्यांनी केली आहे. अशा 9 खटल्यांवर हायकोर्टात उद्या मंगळवारपासून युक्तिवाद होणार आहे.

11 जुलै 2006 साली मुंबईत झालेले बॉम्बस्फोट प्रकरण, प्रीती राठी या परिचारिकेवर अंकुर पनवार याच्याकडून झालेला ऑसिडहल्ला, विवाहबाह्य संबंधामुळे आई आणि पत्नी आणि अडीच वर्षांच्या मुलीची हत्या, पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनीअरचे अपहरण, बलात्कार आणि हत्या, नाशिकमधील एकनाथ कुंभारकर यांनी गर्भवती मुलीची हत्या, 12 कर्षीय मुलाचे अपहरण आणि हत्या, तीन दलित मुलांची हत्या, लैंगिक संबंधासाठी जबरदस्ती करून महिलेसह तिच्या सहा कर्षांच्या मुलाची हत्या आदी प्रकरणांचा समावेश असून यातील आरोपींनी सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात आव्हान दिले आहे. या सर्व खटल्यांकर आज न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.