मध्य प्रदेशात बसला भीषण आग; 13 प्रवासी जिवंत जळाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशातील गुना येथे बुधवारी सायंकाळी उशिरा डंपरला धडकल्यानंतर एका प्रवासी बसला भीषण आग लागली. या आगीत 13 प्रवाशांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला. या बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते. यात डंपर चालकाचाही मृत्यू झाला असून जवळपास 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला. बस गुना येथून आरोनच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱया डंपरला धडकली. धडक होताच बसने पलटी होऊन पेट घेतला. दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नानंतर बसमधील आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असे गुनाचे पोलीस अधीक्षक विजय कुमार खत्री यांनी सांगितले. स्टेअरिंग आणि ब्रेक जाम झाल्याने डंपर थेट बसला धडकला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले व अडकलेल्यांना बाहेर काढले. सध्या मृतांची ओळख पटलेली नाही.