भोरच्या जंगलात सापडला पुण्यातील व्यवसायिकाचा मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पुण्यातील व्यवसायिकाचा कसा खून करून हातपाय बांधून मृतदेह भोर तालुक्यातील नांणेदांड डोंगराच्या झाडीमध्ये फेकून दिल्याचा प्रकार रविवारी रात्री समोर आला. याप्रकरणी भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिकबचंद रायचंद ओसवाल (वय ६०, रा. पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे.

भोर तालुक्यातील नाणेदांड डोंगरात झाडामध्ये एक मृतदेह फेकून दिल्याचे शिळीम गावातील रहिवास्यांना रविवारी रात्री आठच्या सुमारास कळाले. पोलीस पाटील हणुमंत गणपत डेरे यांनी ही माहिती भोर पोलीसांना दिली. भोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, त्यांचे हात-पाय आणि तोंड बांधण्यात आले होते. तर डोक्यात कोणत्यातरी हत्याराने मारून खून केल्याचे स्पष्ट झाले. रात्रभर तपास केला नंतरही म्रुतदेहाची ओळख पटत नव्हती. सोमवारी दुपारी पुण्यातील व्यावसायिक ओसवाल असल्याचे समोर आले.

ओसवाल हे १० जानेवारीपासून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. याबाबत मिसींगची तक्रारही दाखल असल्याचे भोर पोलीसांनी सांगितले. ओसवाल यांचा खून कोणी केला व का केला हे स्पष्ट झालेले नाही. पोलिसांचा तपास सुरू आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले.