
भारत विकास परिषद या सामाजिक संस्थेद्वारे मालाड येथे बीव्हीपी क्रिकेट प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते. बीव्हीपीच्या जेबी नगर शाखेच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गोरेगाव येथील बांगूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये घेण्यात आलेली ही स्पर्धा वसई वॉरियर्स (वसई शाखा) ने जिंकला, तर जेबी नगर शाखेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
दरम्यान, वसई शाखेचे अध्यक्ष प्रदीप भार्गव, नारायण पांडे आणि विक्रम भाटिया यांनी प्रतिष्ठित चॅम्पियनशिप जिंकल्याबद्दल विजयी टीम वसई शाखेचे अभिनंदन केले. पुढील बीव्हीपी क्रिकेट प्रीमियर लीग भाईंदर शाखेमध्ये होणार असल्याचे जाहीर केले.
सर्वोत्कृष्ट गोलंदाज – राजेश नायर
सर्वोत्कृष्ट खेळाडू – शिवम




























































