
देशभर कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या झपाटय़ाने कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना कोरोनाचे अतिरिक्त निर्बंध कमी करण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्यांनी आपल्या पातळीवरील कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घ्यावा, तसेच अचानक झालेल्या रुग्णवाढीनंतर लागू केलेले अतिरिक्त निर्बंध शिथिल करावेत, अशी सूचना करणारे पत्र केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पाठवले आहे. देशात 21 जानेवारीपासून महामारी झपाटय़ाने ओसरत चालली आहे.






























































