मध्य रेल्वेची रखडपट्टी सुरूच, कारणही अस्पष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

कधी ओव्हरहेड वायर तर कधी रुळांवरून घसरण अशा कित्येक समस्यांमुळे रखडणारी मध्य रेल्वे शुक्रवारी सकाळी पुन्हा रखडली. जलद मार्गावरील लोकलचा तब्बल 45 मिनिटं खोळंबा झाला. तर धीम्या मार्गावरील गाड्या 10 मिनिटे उशिराने धावत होत्या. ऐन कामाच्या वेळी गाड्यांना उशीर झाल्याने गाड्यांमध्ये गर्दी वाढली. मात्र, मध्य रेल्वेतर्फे कोणतीही उद्घोषणा करण्यात आली नाही. गाड्या उशिराने धावत असूनही रेल्वेने कोणतीही घोषणा न केल्याने प्रवासी मात्र चांगलेच वैतागले.