पुण्यात दुचाकीस्वार महिलाचा पाठलाग करून मंगळसूत्र हिसकाविले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यांनी हैदोस घातला असून दुचाकीस्वार महिलांचा पाठलाग करून दागिने हिसकाविले जात आहेत. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. नातेवाईकांच्या लग्नसमारंभानंतर दुचाकीवर रस्त्याने चाललेल्या महिलेचा पाठलाग करून चोरट्यांनी 45 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना 3 जुलैला येरवड्यातील सादल बाबा चौक ते संगमवाडी परिसर याठिकाणी घडली.

तक्रारदार महिला नातेवाईकाच्या लग्नसमारंभानंतर 3 जुलैला रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास सादल बाबा चौक ते संगमवाडी परिसरातून दुचाकीवर घरी चालल्या होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांचा पाठलाग करून गळ्यातील 45 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अंकुश डांबोळे करीत आहेत.