चंद्रपूर – नगर परिषदेतील कर निरीक्षकाला लाच घेताना पकडले

432

राजुरा नगर परिषदेतील कर निरीक्षक नंदकिशोर सातपुते यांना पाच हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याच्या कारवाईत रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नगरपरिषद कार्यालयात घडली.

तक्रारदार हे राजुरा येशील रहीवासी असून. तक्रारदार याने आजोबाच्या व वडीलांच्या मालमत्तेचा क्रमांक दुरुस्ती करण्याच्या कामाकरीता कर निरीक्षक नंदकिशोर सातपुते यांनी पाच हजाराची मागणी केली.याबाबत तक्रार कर्त्यानी लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून दिनांक 17 मार्च रोजी पाच हजार रुपये लाच घेताना रंगेहात नंदकिशोर सातपुते यांना पकडले.

आपली प्रतिक्रिया द्या