
गोवंश तस्करीविरोधात चंद्रपूर पोलिसांची धडक कारवाई सुरू असून, मागील दीड वर्षांत चंद्रपुर जिल्ह्यात १३० गुन्हे दाखल झाले आहेत व तब्बल ३२६ आरोपींना अटक करण्यात आले आहे. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी चंद्रपूर सारख्या जिल्ह्यांत मकोका (MCOCA) अंतर्गत कठोर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
अवैध कत्तलीसाठी नेले जाणारे लाखो रुपये किमतीचे गोवंश जप्त करण्यात आले असून, कंटेनर आणि ट्रकसारखी वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. या पाच महिन्यात ४९ गुन्हे तर १२२ आरोपी अटक करण्यात आले आहेत तर मागील वर्षी ८१ गुन्हे तर २०४ आरोपीला अटक करण्यात आले आहे. दीड वर्षात १३० गुन्हे तर ३२६ आरोपी अटक करण्यात आले आहे. गोवंश तस्करीच्या प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यात ‘मकोका’ अंतर्गत गुन्हा ही नोंदवण्यात आला आहे.
कुख्यात गोवंश तस्कर इम्रान बब्बू शेख टोळीवर मकोका
कुख्यात तस्कर इम्रान बब्बू शेख आणि त्याच्या टोळीविरुद्ध थेट ‘मकोका’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवंश तस्करीच्या प्रकरणात जिल्ह्यात ‘मकोका’ लावण्याची ही पहिलीच वेळ असल्याने गुन्हेगारी जगतात प्रचंड खळबळ उडाली आहे. मुख्य आरोपी इम्रान बब्बू शेख आणि त्याच्या टोळीविरुद्ध यापूर्वीही संघटित गोवंश तस्करीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. ही टोळी सातत्याने सक्रिय असल्याचे पाहून जिल्हा पोलिसांनी मकोका लागू करण्याचा प्रस्ताव नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठवला होता. २५ मे रोजी या प्रस्तावाला मंजुरी मिळताच तस्करांवर ‘मकोका’ची कठोर कारवाई करण्यात आली.





























































