
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील जंगलात कक्ष क्रमांक 559 मध्ये एक मृत वाघीण आढळल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी संध्याकाळी ही वाघीण रोपवाटिकेतील नाल्याच्या काठावर दिसली होती.
वाघीण आढळताच स्थानिकांनी वनविभागाला कळवले. मात्र बचाव पथक घटनास्थळी पोहोचण्याच्या आधीच वाघिणीचा मृत्यू झाला होता. वाघिणीचे सर्व अवयव शाबूत असून मंगळ्वारी रात्री वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या वाघिणीचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. वृद्धापकाळ व भुकेमुळे तिचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. दरम्यान याच भागातील पोडसा येथे काही दिवसांआधी एक वाघ मृतावस्थेत आढळला होता. त्यानंतर याच भागातील दुसऱ्या वाघाच्या मृत्युने वनविभागाची गस्त आणि कार्य पद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

































































