
चारधाम यात्रेसाठी गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यंदा 22 एप्रिलला गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे उघडण्याच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदा 22 एप्रिलपासून चारधाम यात्रा सुरु होणार असून 22 एप्रिलपासून उत्तराखंडमध्ये भाविक येण्यास सुरुवात होणार आहे.
गंगोत्री आणि यमुनोत्री धाम उत्तरकाशीमध्ये आहेत. 22 एप्रिलला या धामचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. गंगोत्री हे पवित्र तीर्थस्थळ आहे. येथील गंगोत्रई नगरपासून 19किमीवर गोमुख आहे. ते गंगा नदीचे उगमस्थान मानण्यात येते. गंगोत्रीतील गंगा मातेचे मंदिर समुद्रसापाटीपासून 3042 मीटरच्या उंचीवर आहे. हे स्थान उत्तरकाशीपासून 100 किमलोमीटरच्या अंतरावर आहे.
गंगोत्री मंदिराचे निर्माणकार्य गोरखा कमांडर अमरसिंह थापा यांनी 18 व्या शतकाच्या सुरुवातीला केले होते. याचे पुनरुज्जीवन जयपूर राजघराण्याने केले आहे. दरवर्षी मे महिन्यापासून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत अनेक भाविक गंगोत्रीच्या दर्शनासाठी येतात. यंदा 22 एप्रिलला या धामचे दरवाजे उघडणार आहेत. दरवर्षी अक्षयतृतीयेच्या मूहूर्तावर या धामचे दरवाजे उघडतात आणि दिवाळीला धामचे दरवाजे बंद करण्यात येतात. यंदा बद्रीनाथचे दरवाजे 27 एप्रिलला उघडण्यात येणार आहेत. 27 एप्रिलला 7 वाजून 10 मिनिटांनी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदा 22 एप्रिलपासून चारधामची यात्रा सुरु होणार आहे.