चेन्नई सुपर किंग्जचे आयपीएल 2020 मधील आव्हान संपुष्टात, साक्षी धोनीची भावुक पोस्ट व्हायरल

तीन वेळची विजेती चेन्नई सुपर किंग्जचा आयपीएल 2020 मधील प्रवास संपला आहे. रविवारी चेन्नई ने बंगळुरूवर विजय मिळवला, मात्र सायंकाळी झालेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा मोठा पराभव करताच चेन्नईच्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशांना सुरुंग लागला.

आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच एम.एस. धोनीचा संघ प्ले ऑफ खेळताना दिसणार नाही. यामुळे चाहत्यांसह खेळाडूही निराश झाले आहेत. याच दरम्यान धोनीची पत्नी साक्षी हिने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट लिहिली आहे.

साक्षीने इन्स्टाग्राम अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक भावुक कविता लिहिली असून चेन्नईला विजेता म्हंटले आहे व हा संघ कायमच चाहत्यांच्या हृदयात ‘सुपर किंग्ज’ म्हणून राहील असा उल्लेख केला आहे.

‘हा फक्त एक खेळ आहे. कधी तुम्ही जिंकता, तर कधी पराभूत होतात. अनेक वर्षे आम्ही शानदार विजयाचे आम्ही साक्षीदार बनलो आहोत, तर काही वर्षे दुःखदायक पराभवही स्वीकारला. एका विजयाचा आनंद व्यक्त करत आहोत, दुसरीकडे हृदयावर आघात होत आहेत’, असे साक्षीने लिहिले आहे. तसेच तुम्ही (सीएसके) विजेते होतात, आणि आहात, असेही साक्षी म्हणते.

screenshot_2020-10-26-16-38-12-271_com-android-chrome

आपली प्रतिक्रिया द्या