
छत्तीसगडच्या तरुणाने कुर्ल्यात येऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लक्ष्मी यादव (25) असे त्या तरुणाचे नाव असून स्वतःच्या मर्जीने आत्महत्या करीत असल्याचे त्याने हातावर लिहिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान विमान बघायची शेवटची इच्छा त्याने व्यक्त केली होती.
आज सकाळी कुर्ला स्थानकाच्या पूर्वेकडील बांधकाम सुरू असलेल्या ब्रिजच्या ब्लॉकच्या आतील मोकळय़ा जा गेत एक तरुण गमछाने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. हे समजतात चुनाभट्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला नजीकच्या रुग्णालयात नेले. तेथे त्याला डॉक्टरांनी दाखलपूर्व मृत घोषित केले. पोलिसांनी अधिक तपास केला असता त्याचे नाव लक्ष्मी यादव असल्याचे निष्पन्न झाले. तसेच तो छत्तीसगडच्या बतौरा गावचा रहिवासी असून रविवारपासून लक्ष्मी बेपत्ता असल्याचे तपासात समजले





























































