
सामना ऑनलाईन । बीजिंग
चीन सरकाराने शिनजियांग भागातील शिनजियांग भागातील उइगर मुस्लिमांविरोधात आघाडी उघडली असून दहशतवाद आणि फुटीरतावाद पसरवणार्यांना 30 दिवसांच्या आत आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. चीन सरकार उइगर मुस्लिमांमधील धार्मिक कट्टरता रोखण्यासाठी प्रयत्न करत असून सरकारने या भागातील मुस्लिमांवर दबाव टाकला आहे. साम्यवादाच्या नावाने मुस्लिम समाजातून त्यांचा धर्म काढून घेतला जात आहे अशी टीका जागतिक स्तरातून चीन सरकारवर होत आहे.
शिनजियांगमध्ये ज्या मुस्लिम संस्था दहशतवाद आणि फुटीरतावादी चळवळीसाठी विदेशातून निधी मिळवतात चीन सरकारने त्यांना लक्ष्य केले आहे. तसेच जे लोक दहशतवादला खतपाणी घालत आहेत त्यांनी पोलिसांकडे आत्मसमर्पण केल्यास त्यांना कमीत कशी शिक्षा होईल असेही जाहीर केले आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहेत त्यांनाच आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे.




























































