फक्त कोल्डड्रिंक नाही, आता कोका कोलाचा फोनही येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्डड्रिंकसाठी प्रसिद्ध असलेली कोका कोला कंपनी आता स्मार्टफोनच्या जगात आपले नशीब आजमावणार आहे. लवकरच कंपनी कोका कोलाचा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

शीतपेयांचा ब्रँड कोका-कोला जगभरात प्रसिद्ध आहे.आता हीच कंपनी स्मार्टफोन घेऊन येत आहे. या कंपनीचा स्मार्टफोन कसा असणार याचा फोटोही समोर आला आहे. त्यामुळे फोन कसा असेल याचा अंदाज सगळ्यांना आला असेल. कोका कोला फोनची माहिती हिदुस्थानचे टिपस्टर मुकुल शर्मा यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. फोनचे फोटो शेअर करताना त्यांनी सांगितले की, मोबाईल मार्चपूर्वीच हिंदुस्थानच्या बाजारपेठेत येणार आहे. कंपनी एका स्मार्टफोन ब्रँडसोबत भागीदारी करणार आहे, त्यानंतर कोका-कोलाचा स्मार्टफोन वापरण्यास सक्षम असाल.