भाजपविरोधात मुंबईत काँग्रेसचं आंदोलन; वडेट्टीवार, वर्षा गायकवाड यांचाही सहभाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना रावणाच्या रुपात दाखवणारं पोस्टर सध्या व्हायरल होत आहे. हे पोस्टर भाजप समर्थकांकडून बनवण्यात आल्याचं बोललं जात आहे. याविरोधात मुंबई प्रदेश काँग्रेसकडून भाजपविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. दरम्यान या आंदोलनावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलीस आमने-सामने आले. या आंदोलनामध्ये विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपविरोधात यावेळी प्रचंड घोषणा देण्यात आल्या.