“गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ”… काँग्रेसचा नारायण राणे यांना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नारायण राणे हे पत्रकारांशी बोलताना दिसत आहे. मात्र पत्रकारांच्या एका प्रश्नाने नारायण राणे यांची विकेट घेतली. शेवटी राणेंना त्यांच्या पीएला त्याबाबत विचारल्याशिवाय पर्याय उरला नाही.

देशाचे उद्योगमंत्री असलेल्या नारायण राणे यांना पत्रकाराने सीबील स्कोअर कमी असलेल्या व्यावसायिकांना बँका कर्ज देत नाहीत त्याबाबत विचारले. त्यावर नारायण राणे यांनी थेट सीबील म्हणजे काय असे विचारले. अखेर त्यांच्या पीएने त्यांना सीबील विषयी सांगितले. त्यानंतर नारायण राणे यांनी अखेर त्या प्रश्नाचं उत्तर दिलं.

या व्हिडीओ वरून महाराष्ट्र काँग्रेसने नारायण राणे आणि भाजपवर टीका केली आहे. ””गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ” अशी मोदींच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांची अवस्था आहे. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय सांभाळणाऱ्या या महान व्यक्तीच्या गावी “सिबिल स्कोर” सारखी सूक्ष्म गोष्ट देखील नाही, यावरूनच मोदी राजवटीत गल्ली ते दिल्ली एकंदरीत सगळा आनंदी आनंद आहे हेच दिसून येते”, अशी पोस्ट महाराष्ट्र काँग्रेसने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर या व्हिडीओसोबत पोस्ट केली आहे.