मालवाहू कंटेनरवर होंडा कार धडकल्याने दोघे गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहुरी

रस्त्यावर उभा असलेल्या मालवाहू कंटेनरवर होंडा कार जावुन धडकल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नगर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

नगर मनमाड राज्य मार्गावरील राहुरी फॅक्टरी येथे बुधवारी रात्री १० वाजण्याच्या दरम्यान अपघाताची ही घटना घडली. मालवाहू कंटेनर नगर दिशेला रोडवर उभा होता. पाठीमागच्या बाजुने राहुरीकडे येणारी होंडा एम.एच.१७ ए.जे.८१६७ वरील चालकास उभ्या कंटेनरचा अंदाज न आल्याने कारवरील नियंत्रण सुटून पाठीमागच्या बाजुने कार जावुन धडकली.

या अपघातात राहुरी तालुक्यातील धामोरी गावचे माजी सरपंच सुनिल नामदेव कुसमुडे व राहुरी येथील सोपान रोकडे हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात होंडा कारच्या दर्शनी भागाचा चक्काचुर झाला. परिसरातील नागरीकांनी जखमींना उपचारासाठी हलविण्यात मदतकार्य केले.