
मध्य रेल्वेच्या उफराटय़ा कारभारामुळे जनतेच्या पैशाची उधळपट्टी होत असून कंत्राटदार गब्बर होत असल्याचे दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील लांब पल्ल्याच्या गाडय़ा सुटणाऱया फलाट क्रमांक दहा-अकराचे काम नुकतेच रेल्वेने लाखो रुपये खर्चून केले होते. तो पूर्ण होताच रेल्वेने आता केबल टाकण्यासाठी नवाकोरा फलाट तोडण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे रेल्वे फलाटाची कामे प्रवाशांच्या सोयीसाठी करत आहे की कंत्राटदरांसाठी करत आहे, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी येथे वारंवार फलाटांची, छताची दुरुस्ती, रुंदीकरणाची कामे केली जातात. रेल्वेने नुकतीच एक्सप्रेस ट्रेन सुटणाऱया फलाट क्रमांक दहा- अकराची लांबी वाढवतानाच छताचे आणि फ्लोरिंगचे काम केले होते. चांगल्या दर्जाचे मजबूत फ्लोरिंग फलाटावर लावल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात होते. त्यातच पुन्हा आठवडाभरापासून येथे पुन्हा फ्लोरिंगची तोडपह्ड सुरू केल्याचे दिसत आहे. याबाबत विचारणा केली असता केबल टाकण्यासाठी सदरचे खोदकाम केले जात असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. दरम्यान फलाटाचे फ्लोरिंग बसवण्याआधीच आवश्यकतेनुसार केबल्स टाकल्या असत्या तर पुन्हा जोडपह्ड करावी लागली नसती. मात्र नियोजनाचा अभाव असल्यानेच अशी कामे करावी लागत असल्याची माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.
नियोजनाचा अभाव
एखादे काम करावयाचे असेल तर त्याचे आधी नियोजन केले जाते. बांधकामाचे काम करत असताना त्यात केबल, ड्रेनेज, पिलर आदींबाबत नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र रेल्वेकडे नियोजनाचा अभाव असल्याने वेळ आणि पैसा वाया जात आहे.





























































