कोरोना हवेतूनही पसरतो ! आरोग्य जर्नल ‘लॅन्सेट’चा दावा

corona-mask-driver

कोरोना कशामुळे पसरतो, संसर्गवाढीचे कारण काय, याबद्दल संशोधकांमध्ये दुमत असतानाच जागतिक दर्जाचे आरोग्य जर्नल ‘लॅन्सेट’ने कोरोना हवेतूनही पसरतो असा दावा केला आहे. संसर्ग पसरण्याची इतर कारणे असली तरीही हवेतून पसरणारा संसर्ग वेगवान असल्याचे या संशोधनात म्हटले आहे.

‘लॅन्सेट’ जर्नलने कोरोना संसर्ग फैलावण्यासाठी जबाबदार असलेल्या घटकांचा अभ्यास केला. या क्षेत्रातील विविध मान्यवरांशी चर्चा केली. त्यानंतर जर्नलमध्ये एक विस्तृत अहवाल प्रसिध्द करण्यात आला. अहवालाचे मुख्या लेखक ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या त्रिश ग्रीनहॉल या आहेत. या संशोधनानंतर जागितक आरोग्य संघटनेसह इतर संघटनानी कोरोना संसंर्ग फैलावण्याची व्याख्या बदलली पाहिजे असे डिस्टन्सिंग, मास्क आदी जे नियम आहेत ते या विषाणूला रोखण्यासाठी सक्षम नाहीत असेही त्या म्हणाल्या. ब्रिटन, अमेरीका, कॅनडातील सहा संशोधकांनी हा अहवाल तयार केला आहे.

संशोधनातील दावा

 एका इव्हेंटमध्ये एक संक्रमित व्यक्ती सहभागी झाली. तिने 53 जणांना संक्रमित केले. संशोधनात यापैकी अनेक जण एकमेकांच्या संपर्कातही आले नव्हते, त्यांची भेट झाली होती. हवेतून, संसर्ग पसरल्याचेच यामुळे स्पष्ट होते.

 मोकळ्या जागेत संसर्ग कमी फैलावतो, उलट बंद जागांमध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरतो.

 लक्षणविरहीत असलेल्यांकडूनच संसर्गाचा जास्त फैलाव. जगभरात ‘नॉनसिम्पोमॅटिक’ रूग्णांमुळेच पसरला आहे.

 वजनदार ड्रॉपलेट, हवेत टिकत नाहीत. ते जमिनीवर पडतात आणि यामुळेच संसर्ग फैलावतो.

 हात धुणे, पृष्ठभाग साफ करणे हे तर केलेच पाहिजे, पण हवेतून पसरणारा संसर्ग रोखण्यावर भर दिला पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या