हनुमान चालीसा वाचा, कोरोना पळवा; साध्वी प्रज्ञासिंग यांनी सुचवला आध्यात्मिक मार्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला हरवण्यासाठी अवघे जग शर्थीचे प्रयत्न करीत असताना भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी या महामारीवर आध्यात्मिक उपाय सुचवला आहे. कोरोनाला संपवण्यासाठी सर्वांनी घरातच 5 ऑगस्टपर्यंत प्रत्येक दिवशी संध्याकाळी 7 वाजता पाच वेळा हनुमान चालीसा वाचूया, असे आवाहन त्यांनी रविवारी ट्किटरच्या माध्यमातून केले. 5 ऑगस्टला रामलल्लाची आरती झाल्यानंतर आपापल्या घरात दिवा लावून या धार्मिक विधीचा समारोप करूया, असेही त्यांनी म्हटले आहे.