पैशासाठी केली वृद्ध महिलेची हत्या

पैशासाठी वृद्ध महिलेची हत्या झाल्याची घटना चारकोप परिसरात घडली. अनुसया सावंत असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मोहमद मन्सूर शेखला चारकोप पोलिसांनी अवघ्या बारा तासांत बेडय़ा ठोकल्या. शेखला गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. अनुसया या चारकोपच्या लिंक रोड परिसरात राहत होत्या. त्या दिवसभर जोगवा मागून उपजीविका करायच्या. तेथे शेख हा भंगार उचलण्याचे काम करायचा. सावंत या दिवसभर जोगव्यात मिळालेले पैसे आणि घडय़ाळ पिशवीत ठेऊन लिंक रोड परिसरात फुटपाथवर झोपत असायच्या. त्यांच्याकडे पैसे असल्याचे शेखला माहीत होते. मंगळवारी रात्री सावंत या नेहमीप्रमाणे फुटपाथवर झोपल्या. मध्यरात्री शेख हा तिथे आला. सावंत या झोपेत असताना शेखने डोक्यात दगड घालून तिची हत्या केली.

परिमंडळ-11चे पोलीस उपायुक्त दत्तात्रय नलावडे यांनी या प्रकरणी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. सहाय्यक आयुक्त शैलेंद्र धिवार याच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार केले. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एका फुटेजमध्ये शेख दिसला. त्यावरून तपासाची चव्रे फिरली. पळून जात असलेल्या शेखला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.