
मेष (ARIES – Monday, October 24, 2022)
व्यसनांपासून दूर राहा. हिरव्या रंगांच्या वस्तूंचे दान करा. महत्त्वाचा वेळ वाया घालवू नका. आज जोडीदारासोबत भरपूर वेळ घालवू शकाल. कार्यालयात खेळीमेळीने राहाल. मेहनतीचे फळ चांगले मिळेल. हट्टी स्वभावाचा त्याग करा. चांगल्या संधी चालून येण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा घ्याल. आराध्यदेवतेच्या दर्शनाने मानसिक ताण कमी होईल.
शुभरंग : केशरी
वृषभ (TAURUS – Monday, October 24, 2022)
चुरमुरे वाहत्या पाण्यात प्रवाहित करा. बोलताना विचार करूनच बोला. अनोळखी लोकांशी भेट होईल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपा. घरातील लहान मुलांसाठी वेळ काढाल. दिलेली वचनं पाळायला शिका. उगाचच कोणाला आश्वासने देऊ नका. जोडीदारासोबत मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्याचा प्लॅन आखाल. मनाजोगती खरेदी करता येईल. कुलदेवतेच्या दर्शनाला जा.
शुभरंग : हिरवा
मिथुन (GEMINI – Monday, October 24, 2022)
आपल्या कामाला नशिबाची साथ मिळेल. करियरमध्ये यश मिळेल. अनाथाश्रम, वसतिगृहे आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये पैसे दान करा. स्वत:तील कलात्मकता जोपासाल. कामाच्या ठिकाणी चौकस राहावे लागेल. निर्भयपणे वावरा. रिकाम्या वेळेचा पूर्ण आनंद घ्याल. आवडते काम करा. सकारात्मक बदल होईल. कलागुण जोपासाल. मारुतीचे दर्शन घ्या.
शुभरंग : आकाशी
कर्क (CANCER – Monday, October 24, 2022)
सुखसुविधांकरिता पैसे खर्च होतील. ब्यूटिपार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ काढाल. आळस घालवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांचा लाभ घ्या. आंघोळीच्या पाण्यात कापूर घाला. महत्त्वाची कामे कोणाच्याही सहकार्याशिवाय हाताळू शकाल. तुमच्यातील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. पक्ष्यांना दाणे खाऊ घाला.
शुभरंग : खाकी
सिंह (LEO – Monday, October 24, 2022)
चांदीच्या ग्लासातील पाणी प्या. आरोग्याची काळजी घ्या. आहाराचे पथ्यपाणी सांभाळावे लागेल. गर्दीत जाणे टाळा. सकाळी हिरव्या गवतावरून चाला. मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी ध्यानधारण कार. प्राणायाम करा. बागकामात मन रमवाल. गाईला चारा खाऊ घाला. आवडते संगीत ऐका. प्रियजनांच्या सान्निध्यात राहाल.
शुभरंग : तांबडा
कन्या (VIRGO – Monday, October 24, 2022)
तांब्याची अंगठी बोटात घाला. आजचा दिवस निवांत राहण्याचा आहे. घरात सुखदायी वातावरण असेल. अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा. परदेशातून नोकरीचा कॉल येण्याची शक्यता आहे. कुटुंबातील गरजा पूर्ण करण्यासाठी वेळ द्याल. माझेच खरे ही मानसिकता ठेवू नका. स्वत:करिता वेळ द्या. शंकराच्या देवळात अभिषेक करून बेलपत्र वाहा.
शुभरंग : निळा
तूळ (TULA – Monday, October 24, 2022)
पांढऱ्या शंखाची पूजा करा. आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता उपाय करावे लागतील. जोडीदाराला समजून घ्याल. योग्य लोकांसमोर तुमचे कौशल्य आणि बुद्धिमत्तेची चुणूक दाखवण्याची संधी मिळेल. जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा उगाळू नका. मेहनतीला यश मिळेल. समाजात मानसन्मान वाढेल. कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न कराल. जोडीदारासोबत वेळ घालवाल.
शुभरंग : पिवळा
वृश्चिक ( SCORPIO – Monday, October 24, 2022)
अचानक एखादी चांगली बातमी कानी येण्याची शक्यता आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. आनंदाचे क्षण अनुभवाल. जोडीदारासोबत छान गप्पा मारता येतील. रखडलेली कामे पूर्ण करण्याच्या मागे लागाल. खरेदीला जाण्यासाठी वेळ मिळेल. आवडता पदार्थ अनपेक्षितपणे खायला मिळेल. दत्तमंदिरात जाऊन प्रदक्षिणा घाला. घरात धार्मिक समारंभाचे आयोजन कराल.
शुभरंग : जांभळा
धनु (SAGITTARIUS – Monday, October 24, 2022)
आहारात कोथिंबिरीचा समावेश करा. आशावादी राहा. मार्ग मिळेल. नवे मित्र जोडाल. इतरांपेक्षा स्वत:ला कसे सुधारता येईल याकरिताच प्रयत्न कराल. जे इतरांना मदत करतात त्यांना देवही मदत करतो. नाती जपायला शिका. प्रिय व्यक्तिमुळे दिवसभरातली मजा वाढेल. आर्थिक मदतीची गरज लागण्याची शक्यता आहे. स्वत:च्या चुका कबूल करायला शिका. आई-वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभरंग : काळा
मकर ( CAPRICORN – Monday, October 24, 2022)
कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. कपाळावर पांढरे चंदन लावा. पैसे उधार घ्यावे लागण्याची शक्यता आहे. सौंदर्याची काळजी घ्या. ब्यूटिपार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ काढाल. अचानक कामातून सुट्टि घेऊन प्रवासाचा प्लॅन कराल. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. तुमच्यासाठी काय चांगले आहे, याचा विचार करून त्या मार्गाने वाटचाल करा. आरोग्याची काळजी घ्या.
शुभरंग : चॉकलेटी
कुंभ (AQUARIUS – Monday, October 24, 2022)
लेखन-वाचनाची आवड निर्माण होईल. झोपतेवेळी तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून सकाळी घराच्या जवळ असलेल्या झाडाच्या मुळांना टाका. जोडीदाराशी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. समाजातील प्रतिष्ठित लोकांच्या भेटीगाठी होतील. लोकं तुमच्या सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील. बोलताना मधुरावाणीचा वापर करावा लागेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मोकळा वेळ आवडते संगीत ऐकण्यात घालवाल.
शुभरंग : हिरवा
मीन (PISCES – Monday, October 24, 2022)
धार्मिक स्थळी मधाचे दान करा. सकारात्मक कामात खंड पडू देऊ नका. यशाच्या मार्गात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न कराल. घराबाहेर जाताना कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तिंचे आशीर्वाद घ्या. मन मारून जगू नका. सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावा. सकाळी कोवळ्या सूर्यकिरणांचा लाभ घ्या. नव्या नोकरीसाठी प्रयत्न कराल.
शुभरंग : जांभळा






























































