
आग्रा येथे आज लाल किल्ल्यात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने दांडपट्टयाला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आले. राज्य सरकारच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 व्या राज्याभिषेक सोहळा वर्ष आणि शिवजयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. दांडपट्टयाला राज्यशस्त्र म्हणून घोषित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.



























































