
सामना ऑनलाईन । मुंबई
बॉलिवूडमधील आयटम गर्ल राखी सावंतने बुधवारी सोशल मीडियावरून तिच्या लग्नाची घोषणा केली. राखीने विनोदी अभिनेता दीपक कलाल सोबत 31 डिसेंबरला लॉस एंजलिसला लग्न करणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र राखीसोबत लग्नासाठी तयार झालेला हा दीपक कलाल एकेकाळी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या प्रेमात होता. विराट कोहलीने गेल्या वर्षी अनुष्का शर्मासोबत लग्न केल्यानंतर दीपक कलालने युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर करून विराट कोहली बेवफा असल्याचा आरोप केला होता.
विराट कोहली व अनुष्का शर्मा हे गेल्या वर्षी 11 डिसेंबर रोजी इटली येथे विवाहबंधनात अडकले. त्याच दिवशी दीपक कलालने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत त्यावरून विराट कोहली बेवफा असल्याचा आरोप केला. या व्हिडीओत विराटचे लग्न झाल्याने तो ढसाढसा रडताना दिसत आहे.
याच दीपक कलालने काही दिवसांपूर्वी तनुश्री दत्तावर टीका केली म्हणून राखी सावंतला खडे बोल देखील सुनावले होते. तसेच यावेळी त्याने राखी सावंतला जर तनुश्री विरोधात काही बोललीस तर मिक्सरमध्ये टाकून तुझी चटणी करेन, अशी धमकी देखील दिली होती.




























































