नदालची माघार; फेडरर अंतिम फेरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नवी दिल्ली 

स्पेनच्या राफेल नदालने इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीतून दुखापतीमुळे माघार घेतली. त्यामुळे त्याचा प्रतिस्पर्धी रॉजर फेडररला पुढे चाल मिळाली. गुढघ्याच्या दुखापतीमुळे नदालने लढतीपूर्वीच माघार घेण्याचा निर्णय घेतला.

आता किताबी लढत स्वित्झर्लंडच्या फेडररची गाठ ऑस्ट्रियाच्या थिएम याच्याशी होईल. नदाल  उजव्या गुढघ्याच्या दुखापतीने अनेक महिन्यापासून त्रस्त आहे. खाचानोवविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत नदालच्या या दुखण्याने पुन्हा डोके वर काढले.