नववर्षाच्या शुभेच्छा देणं जीवावर बेतलं, बाल्कनीतून पडून इंजिनिअरचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

दिल्लीला लागून असलेल्या नोएडा येथे नववर्षाच्या रात्री फ्लॅटच्या बाल्कनीतून पडल्याने एका 28 वर्षीय इंजिनिअरचा मृत्यू झाला. विवेक परमार असे त्याचे नाव असून घरात नेटवर्क नसल्याने विवेक बाल्कनीत मोबाईलवर मित्रांना नववर्षाच्या शुभेच्छा देत होता. त्याचवेळी त्याचा तोल गेला व तो खाली पडला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

विवेक नोएडातील सेक्टर 120 मधील आम्रपाली झॉडीएक सोसायटीत भाड्याने राहत होता. नववर्षा दिनानिमित्त त्याने घरात पार्टीचे आयोजन केले होते. यामुळे घरात विवकचे मित्रही होते. सगळे जण  मद्य पीत नाचत होते. यामुळे विवेक बाल्कनीतून खाली पडला तरीही कोणाला कळाले नाही. तब्बल 40 मिनिटे विवेक तिथेच पडून होता. त्यानंतर विवेक कुठे दिसत नसल्याने सगळे त्याला हाका मारू लागले. त्यावेळी एकाने बाल्कनीतून वाकून बघितले असता विवेक रक्ताच्या थारोळयात खाली पडल्याचे त्याला दिसले. त्यानंतर सर्वजणांनी खाली धाव घातली. विवेकचे मित्र त्याला डॉक्टरकडे घेऊन जात असता सुरक्षा रक्षकाने त्यांना अडवले व तुम्हीच विवेकची हत्या केली असा आरोप करत त्याने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी विवेकच्या सर्व मित्रांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. विवेक मूळचा हिमाचल प्रदेशचा होता. नोकरीसाठी तो नोएडाला आला होता.