
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
दिल्लीत राहणाऱ्या एका महिला पत्रकाराने उबर चालकावर तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. महिलेने टि्वटरवर पोलीस आणि उबर कंपनीला संबंधित चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अमृता दास ही महिला पत्रकार 19 मार्च रोजी आपल्या पतीसोबत उबेर कॅबमधून बाहेर जात होती. त्यावेळी तिने चालकाला एसी सुरू करायला सांगितले. पण त्याने दुर्लक्ष केले. त्यानंतर तिने त्याला पुन्हा एसी सुरू करण्यास सांगितले. यावर त्यांच्यात वाद झाला. त्याचदरम्यान तुला गरम होत असेल तर माझ्या मांडीवर बस असे अश्लाघ्य शब्द चालकाने वापरल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यानंतर अर्ध्यावाटेवर त्याने आपल्याला व पतीला कॅबमधून उतरवले असेही तिने म्हटले आहे.
दरम्यान, महिलेच्या या ट्वीट वर उबर कंपनीने दिलगिरी व्यक्त केली असून चालकावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच महिलेच्या या ट्वीटनंतर दिल्ली पोलिसांनी चालकावर कारवाई का केली नाही असा सवाल करत नेटकऱ्यांनी दिल्ली पोलिसांवर टीका केली आहे.
@Uber_Delhi @Uber @Uber_Support rude and creepy driver. I demand action. First he refused to turn on ac then says garmi lag rahi hai to age mere godi me baith jao. He also ended trip moments after starting to drive and forced me out. This is when I was with husband. @DelhiPolice pic.twitter.com/qE40ib3B5d
— Amrita D (@amritadas) March 19, 2019





























































