शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने कर्जमाफीची रक्कम जमा करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिगोली

पालकमंत्र्यांनी प्रमाणपत्र देऊनही कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन काँग्रेसचे गुजरात राज्य प्रभारी व हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना जाब विचारत या शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने कर्जमाफीची रक्कम जमा करावी, अशी मागणी केली. दरम्यान, शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप, पीकविमा आदी प्रश्नांसह मुद्रा योजनेच्या बेरोजगारांच्या रखडलेल्या कर्जासंबंधीही चर्चा केली. येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन १२ जुलै पासून केले जाणार असल्याचे खासदार राजीव सातव यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना केलेल्या कर्जमाफीचा हिंगोली जिल्ह्यात बोजवारा उडाला आहे. तसेच १ लाखाच्यावर शेतकरी पीककर्जापासुन यंदाच्या वर्षी वंचित राहिले आहेत. विशेष म्हणजे भाजप नेते व हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी कर्जमाफी झाल्याचे प्रमाणपत्र ज्या २३ शेतकऱ्यांना दिले. त्यापैकी १२ च्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफीच झाली नसल्याचे बँकेकडुन सांगितले जात आहे. या पार्श्वभुमिवर हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्याशी या सर्व विषयावर खासदार सातव यांनी शेतकऱ्यासमक्ष चर्चा केली. यावेळी विविध बँकेच्या अधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आले होते. प्रमाणपत्र मिळाल्यावर कर्जाची रक्कम संबंधीत शेतकऱ्यांच्या खात्यावर का जमा झाली नाही असा सवाल खासदारांनी केल्यावर बँक अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. तसेच शेजारच्या नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पीकविमा मिळाला असतांना हिंगोली जिल्ह्याला मात्र १३ कोटी रुपये आले आहेत. मागिल व यावर्षीच्या पीकविम्याची रक्कम बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात वळती करुन घेतली आहे. ही रक्कम पुर्ववत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी सुचना खासदार सातव यांनी केली. तसेच विविध बँक शाखांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे अतिरिक्त कर्मचारी तातडीने द्यावेत आणि मुद्रा योजनेतर्गत बँकांमध्ये दलालामार्पâत काही विशिष्ट लोकांचीच कामे होत असुन सीसीटीव्ही पुâटेज तपासुन संबंधीत दलालावर गुन्हे दाखल करावेत आणि दोषी असलेल्या बँक अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव जगताप, गयबाराव नाईक, विलास गोरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.