Video – राज्यात बंद पडलेले ऑक्सिजन प्लांट पुन्हा सुरू करण्याची चाचपणी – अजित पवार

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य सरकार विविध पातळ्यावर काम करत असून राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री आपापल्या परिने विविध लोकांशी बोलत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच दुसऱ्या बाजूला 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा कार्यक्रम सुरू करत आहोत. यासाठी मुख्य सचिवांना कॅबिनेटने पूर्ण अधिकार दिलेले आहेत. राज्यात बंद पडलेले ऑक्सिजन प्लांट पुन्हा सुरू करण्याची चाचपणी करण्यात येत आहे. तसेच साखर कारखान्यांनी ऑक्सिजन तयार करून तो सिलिंडरमध्ये भरता येतो का, याचाही प्रयत्न सुरू असल्याचेही पवार यांनी सांगितले.
आपली प्रतिक्रिया द्या