धारावीत विद्यार्थ्यांचे लसीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धारावीतील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित छत्रपती शिवाजी विद्यालय येथे नुकतेच 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. शहरातील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येत असल्याने पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्वच शाळा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विविध शाळांमध्ये लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. शालेय शिक्षण क्रीडा विभाग आणि पालिकेच्या एफ नॉर्थ विभागाच्या माध्यमातून हे लसीकरण करण्यात आल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका वीणा राजेंद्र दोनवलकर यांनी दिली. शाळेतील 106 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.