स्मृतिगंध – स्वर राहील भरूनी…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • दिलीप जोशी

प्रसिद्ध व्हायोलिनवादक आणि संगीतकार प्रभाकर जोग यांचं नुकतंच निधन झालं. संगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक म्हणून तब्बल सहा दशकांहून जास्त वर्षे कार्यरत असलेल्या प्रभाकर जोग यांचे मराठी आणि हिंदी चित्रपट संगीताबरोबरच भावसंगीतातही मोलाचे योगदान आहे. व्हायोलिनवरचं त्यांचं कुठलंही गाणं त्या त्या गायक–गायिकेच्या पंठातूनच उमटतंय असं वाटतं. स्वरसमृद्ध आयुष्य जगणाऱया जोगांच्या व्हायोलिन वादनात स्वरमाधुर्याबरोबरच विलक्षण सहजता होती. 

स्वर आले दुरुनि, जुळल्या सगळ्या त्या आठवणी’ या प्रभाकर जोग यांचं संगीत असलेल्या गाण्याची कथाही तीन प्रसिद्ध संगीतकारांचे ‘सूर’ कसे जुळले होते ते सांगणारी आहे. त्यावेळी संगीतकार यशवंत देव नागपूरला होते. जोगांना या गाण्याचे स्वर सुचले आणि त्यांनी ते पत्राने स्वरलिपीत देवांकडे पाठवले. त्यावर देवांनी ‘स्वर आले दुरुनि’ अशी खरोखरच दूरवरून आलेल्या स्वरांसाठी उत्तम शब्दरचना केली. वास्तविक देवही गात असत. पण या गीतासाठी या दोघांनी सुधीर फडके यांना विचारलं आणि आपले सहकारी असलेल्या जोगांच्या सुरावटीतलं हे गाणं बाबूजी उत्कटतेने गायिले. तो मराठी भावगीतांचा सुवर्णकाळ होता. परस्परांच्या संगीत रचनांना दाद देण्याचं औदार्य दाखविण्याचा होता. कोणत्या गीताला कोण न्याय देऊ शकेल याची जाणीव आणि निकोप होती. त्या काळाने मराठी मन अनेक दिग्गजांच्या संगीताने भारून टाकलं. प्रभाकर जोग त्यापैकीच एक.

व्हायोलिन हा जोगांचा प्राण होता. सुधीर फडके यांच्याकडे सहकारी म्हणून काम करणारे जोग पिंवा पेटीवादक बाबूराव कांबळे यांचं मत फडके ध्यानात घेत. वाद्यमेळाबरोबर, मनमेळही साधला होता. त्यातूनच ‘स्वर आले दुरुनि’ अशी तीन संगीतकारांची गुंफण करणारी रचना जन्माला आली.

सुधीर फडके, यशवंत देव आणि प्रभाकर जोग मुंबईत दादरला हाकेच्या अंतरावर राहात. अनेकदा संध्याकाळी शिवाजी पाका&च्या आसपास त्यांचं दर्शन होत असे. बाबूजींना तर अनेकदा पाहिलं. ‘नमस्कार बाबूजी’ असं म्हटलं की ते हसून मान डोलावत. एकदा शिवसेना भवनाच्या जवळच्या पेपर स्टॉलवर संध्याकाळचा पेपर घ्यायला ते आले असताना थोडीशी बातचीत झाली. त्यांच्या आणि देवांच्या घरीही जायचा योग आला. जोग मात्र बऱयाचदा दिसले ते त्यांच्याच शेजारी माझी आतेबहीण राहत असल्याने. तिचे यजमान दादा ठकार प्रसिद्ध फ्लूटवादक होते. त्यांनी हेमामालिनीच्या ‘मीरा’ चित्रपटासाठी बासरी वाजवली होती. दोन स्वरसिद्ध वादक शेजारी असल्यावर भेटागाठी होणारच.

प्रसिद्ध संगीतकारांचे सहकारीही पुढे प्रसिद्ध संगीतकारही झाले. संगीतकार गुलाम महंमद यांचे सहकारी नौशाद पिंवा एस. डी. बर्मनकडचे जयदेव अशी काही उदाहरणं आठवतात.

प्रभाकर जोगांचं वैशिष्टय़ म्हणजे संगीताच्या स्वरलिपीवर (नोटेशन) असलेली त्यांचं प्रभुत्व उत्तम स्वरलिपी लेखन हा सखोल अभ्यासाचा विषय. जोग त्यात प्रवीण होते. व्हायोलिन वादनात त्यांचा किती प्रभाव होता हे त्यांच्या ‘गाणारे व्हायोलिन’ या कार्यक्रमाचं यूटय़ूबवर उपलब्ध असलेलं रेकॉर्डिंग आजही सांगेल.

1932 ते 2021 असं अठ्ठय़ाऐंशी वर्षांचं स्वर समृद्ध जीवन व्यतीत करून जोग कालवश झाले. मात्र त्यापूर्वी जवळपास सत्तर वर्षांचा काळ त्यांच्या व्हायोलिनने गाजवला. त्यांचे ज्येष्ठ बंधू वामनरावही इंदूर आकाशवाणीसाठी व्हायोलिन वाजवत असे या वादाचे सूर घरातच भरले होते. प्रभाकर जोगांनी या वाद्याला अक्षरशः गातं केलं. व्हायोलिनवरचं त्यांचं कुठलंही गाणं त्या त्या गायक-गायिकेच्या पंठातूनच उमटतंय असं वाटतं. जोगांच्या व्हायोलिन वादनात स्वरमाधुर्याबरोबरच विलक्षण सहजता होती. त्यांचा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहणारे श्रोते मंत्रमुग्ध होत असत.

जोग संगीतकार म्हणूनही आपला ठसा उमटवून गेले. सुरुवातीला उल्लेख केलेलं जसं तीन संगीतकारांचं गाजलेलं गाणं आहे तशीच जोगांनी संगीत दिलेली, माडगूळकर, खेबुडकर आणि दादा काsंडके यांनी लिहिलेली गाणीही गाजली. खेबुडकरांचं ‘शुभंकरोती म्हणा’ हे गाणं लता मंगेशकरांनी गायिलं. ‘धुंद आज डोळे, हवा धुंद झाली’ हे गाणं मन्ना डे यांच्या तर आज प्रीतीला पंख हे लाभले रे’ आशा भोसले यांच्या स्वरातले गीत. याशिवाय ‘आज कळीला एक फूल भेटले’ आणि उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी’ अशी अनेक गाणी आशाताईंची. ‘कशी मी सांगू वडिलांपुढे’ (मालती  पांडे), ‘लक्ष्मी तू या नव्या घराची झालीस ग लाडके’ (माणिक वर्मा), ‘लपविलास तू हिरवा चाफा’ या खूप गाजलेल्या गदिमांच्या गाण्याचं संगीत जोगांचंच आणि स्वरमालती पांडे यांचा ‘चल रं शिरपा, देवाची किरपा’ आणि ‘हिल हिल पोरी हिला’ या दादा काsंडके यांच्या सिनेगीतांना जोगांनी संगीत दिलं. जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकरांचा स्वरसाज या गाण्यांना लाभला. ‘पहाटे पहाटे जाग आली’ या सुरेश भट यांच्या गीताला जोग, रवी वेदाते आणि सी. रामचंद्र या तिघांनी संगीत दिले. जोगांच्या संगीतातलं गाणं वसंत आजगावकर यांनी गायिलेलं आहे. ‘सोनियाचा पाळणा, रेशमाचा दोट’ हे जोगांनी संगीत दिलेलं गाणं मंदाकिनी पांडे यांनी गायलं.

जोगांच्या व्हायोलिनवादनाचे काही कार्यक्रम ऐकण्याचा योग आला. एका कार्यक्रमानंतर त्यांना भेटलो तेव्हा ते ऐंशीच्या घरात होते. तरीही व्हायोलिनवरची हुकूमत तशीच होती. कार्यक्रमानंतर त्याना भेटलो आणि म्हटलं, तुमचे मुंबईतले शेजारी ठकार हे माझे नातेवाईक. शकूताई ठकार माझी सख्खी आतेबहीण त्यावर ते हसून म्हणाले आम्हीही सख्खे शेजारी!’

जोग गेल्यावर ठकारांकडे पह्न केला. बासरीवादक दादा ठकार आता नाहीत, पण शकूताई आणि त्यांचा पुत्र सतीश यांनी जोगांच्या हृद्य आठवणी सांगितल्या. जोगांचे आणि आमचे इतके घरोब्याचे संबंध होते की अनेक वेळा दादांच्या आणि त्यांच्या सांगीतिक गप्पा तर व्हायच्याच, पण आमच्याकडचं जेवणही त्यांना खूप आवडायचं. जोग गाणी तयार करत असताना ते प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभवही अनेकदा मिळाला. ज्यांच्याकडून जोगांनी व्हायोलिनचे पहिले धडे घेतले ते त्यांचे बंधू वामनरावही मुंबईला आले की आमच्याकडे येत. आमच्या दादांनी तर जोगांच्या अनेक गाण्यासाठी बासरी वाजवली आणि दादांच्या एकसष्टीच्या घरगुती कार्यक्रमात जोगांनी अप्रतिम व्हायोलिनवादन करून स्वरभेट दिली. जोग काकांचं जीवन सात्त्विक म्हणता येईल असं होतं. त्यांच्या पत्नी नीला (पूर्वीच्या कुसुम) यासुद्धा उत्तम गायिका होत्या. नंतर मालती पांडे यांच्या स्वरात ध्वनिमुद्रित झालेलं ‘लपविलास तू हिरवा चाफा’ हे गाणं आधी नीला जोग यांनी गायिलं होतं. ते गाणं म्हणजे त्या दोघांच्या प्रेमाचं प्रतीक होतं. मित्रमंडळींच्या मैफलीत काकू हे गाणं आवर्जून म्हणत. त्यासुद्धा संगीताच्या जाणकार होत्या. जोगांनी चाल लावलेल्या गाण्याबाबत प्रसंगी त्या उपयुक्त सूचनाही करत असतं. पुढे जोग पुण्याला राहायला गेले. पण काही महिन्यांपूर्वी मुंबईला आले असताना आम्हाला आवर्जून भेटले.

अशी ही एका साध्या परंतु खूप मोठय़ा माणसाची सांगीतिक कहाणी. व्हायोलिनबरोबरच जीवनाशीही त्यांचे सूर जुळले होते. आता जोगांच्या नव्या स्वररचना कानी पडणार नाहीत हे खरंच पण त्यांनी आजवर निर्माण केलेले मधुर सूर रसिकांच्या मनात कायमचे भरून राहतील यात शंका नाही.