
>> दिलीप जोशी
1984 ते 1996 या काळात हिंदुस्थानात पाराबोलिक डिश आन्टेना (अन्वस्त) असलेही ‘मीटर वेव्ह’ परिमाणातला रेडिओ टेलिस्कोपचा भव्य प्रकल्प उभा राहिला. त्याचे प्रणेते होते डॉ. गोविंद स्वरूप. खगोल अभ्यासाच्या आवडीमुळे आम्हाला ज्या शास्त्रज्ञांशी संवाद साधता आला त्यातले एक गोविंद स्वरूप. 1995 मध्ये खग्रास सूर्यग्रहण पहायला आम्ही सुमारे 300 जणांना घेऊन उत्तर प्रदेशातील हमीदपूर येथे गेलो तेव्हा स्वरूप यांच्याशी खूप गप्पा झाल्या. त्यांची विस्तृत मुलाखत चित्रीत करता आली. ते क्षण मोलाचे होते.
1980च्या फेब्रुवारी महिन्याच्या 16 तारखेला दक्षिण हिंदुस्थानातून दिसलेले खग्रास सूर्यग्रहण पहायला आणि पत्रकार म्हणून ‘इव्हेन्ट कव्हर’ करायला गेलो. तेव्हापासून खगोल-कुतूहल जागृत झालं ते पुढे वाढतच गेलं. 1985 मध्ये आम्ही काही जणांनी खगोल मंडळाची स्थापना केली आणि त्यातच 45 वर्षे रमलो. 1609 मध्ये गालिलिओ यांनी अवकाशाकडे भिंगाची दुर्बीण रोखण्यापूर्वीही ग्रह-नक्षत्रांची जाणीव, जगातल्या अनेक संस्कृतींना होतीच. परंतु त्याचं यथार्थ आकलन होण्यासाठी नवनव्या खगोलीय उपकरणांची मदत झाली तीही मोलाची होती. भिंगानंतर आरशाची दुर्बीण आली. त्यानंतर जगभर प्रचंड व्यासाचा परावर्ती आरसा असलेल्या महाकाय दृश्य (आाप्टिकल) दुर्बिणी उभारल्या गेल्या. आपल्याकडेही कवलूर येथे अशी दुर्बीण आकाराला आली. त्या दुर्बिणीच्या आरशाचा व्यास 90 इंचापलीकडे आहे.
आता तर जेम्स वेब अवकाश दुर्बीण विश्वातील गूढ वाटणाऱया गोष्टी सतत पृथ्वीवर पाठवत आहे. जो प्रकाश आपल्या नजरेला आणि आाप्टिकल टेलिस्कोपला दिसतो, त्या पलीकडेही काही प्रारणं (तरंग लहरी) आहेत, त्यापैकी एक रेडिओ लहरी. त्या रेडिओ कार्यक्रमांचे प्रसारण अशाच ‘हर्ट्झ’ परिमाणाच्या लहरींद्वारे होते. दृश्य लहरी पकडून होणारं प्रसारण प्रकाशलहरींचं असतं तो टीव्ही. म्हणूनच पु. ल. देशपांडे यांनी देशातल्या पहिल्या टीव्ही कार्यक्रमाच्या प्रसारणाच्या वेळी रेडिओला आकाशवाणी तर टीव्हीला प्रकाशवाणी म्हणावं असं सुचवलं होतं. …तर मुद्दा रेडिओ लहरींचा. अवकाशातील दूरस्थ तारे, क्वेसार (किंतारा), पल्सार (स्पंदक तारा) आणि अनेक नेब्युले (तेजोमेध) यांचा वेध घेण्यात दृश्य-दुर्बिणीला मर्यादा पडतात. मात्र तिथून येणारे अदृश्य रेडिओ स्रोत पकडता आले तर विश्व अधिक जाणून घेता येईल. या विचारातून कार्ल जान्स्की यांनी 1936 मध्ये पहिली रेडिओ दुर्बीण बनवली. हळूहळू त्यात सुधारणा होत गेल्या आणि 1984 ते 1996 या काळात हिंदुस्थानात पाराबोलिक डिश आन्टेना (अन्वस्त) असलेही ‘मीटर वेव्ह’ परिमाणातला रेडिओ टेलिस्कोपचा भव्य प्रकल्प उभा राहिला. त्याचे प्रणेते होते डा. गोविंद स्वरूप.
खगोल अभ्यासाच्या आवडीमुळे आम्हाला ज्या शास्त्रज्ञांशी संवाद साधता आला त्यातले एक गोविंद स्वरूप. 1995 मध्ये खग्रास सूर्यग्रहण पहायला आम्ही सुमारे 300 जणांना घेऊन उत्तर प्रदेशातील हमीदपूर येथे गेलो तेव्हा स्वरूप आणि त्यांच्या पत्नीही आमच्या समवेत होत्या. त्या तीन दिवसांत त्यांच्याशी खूप गप्पा झाल्या. त्यांची विस्तृत मुलाखत चित्रीत करता आली. देशात रेडिओ टेलिस्कोप उभारणारे शास्त्रज्ञ आमच्या बरोबर आले याचा अभिमान वाटला.
स्वरूप यांचा जन्म उत्तर प्रदेशातील ठाकुरद्वारचा. त्यांनी प्रयागराज येथून पदवी प्राप्त केली. 1952 मध्ये आास्ट्रेलियातील सीएसआयआर संस्थेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. 1960च्या दशकात त्यांनी स्टानफर्ड (अमेरिका) विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केली. मग दिल्लीतल्या राष्ट्रीय भौतिकी संस्थेत कार्यारंभ केला. त्यापूर्वी त्यांनी स्टानफर्डमध्येच सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही काम केले होते. 1984 मध्ये टीआयएफआरने जायन्ट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा स्वरूप तिथले पहिले प्रमुख झाले. त्यांच्या नेतृत्वात 1984 ते 1996 या काळात आपल्या महाराष्ट्रातील नारायणगावजवळील खोडद गावात रेडिओ टेलिस्कोप उभा राहिला. दूरस्थ क्लेसार पल्सारचा वेध घेणं आणि विश्वनिर्मितीच्या काळातला हायड्रोन (प्रायआार्डिअल हायड्रोन) मिळतो का पाहणं हा महत्त्वाचा उद्देश आहे, असे स्वरूप यांनी मोजक्या आणि नेमक्या शब्दांत सांगितलं होतं. 45 मीटर व्यासाच्या 30 डिश आन्टेना तयार करून त्या इंग्लिश ’भ्’ आकारात बसवल्याने 25 चौरस किलोमीटर क्षेत्रातून रेडिओ लहरींचा वेध घेता यावा म्हणून आम्ही खोडदसारखं ठिकाण निवडलं, असे ते म्हणाले होते. जेव्हा हे काम सुरूच होतं तेव्हा आम्ही 1993 मध्येच पुण्यातील जीएमआरटीच्या कार्यालयाला भेट देऊन स्वरूप यांच्या नंतरचे संचालक डा. कपाही यांची मुलाखत तसंच ‘खोडद’ येथील या भव्य टेलिस्कोपचंही चित्रण केलं. अवकाशातून येणाऱया रेडिओ स्त्राsतांमधील अनावश्यक भाग (स्काय नाइज) काढून क्रायजेनिक कुलिंगद्वारे ते सिग्नल आाप्टिकल फायबरने प्रोसेसरपर्यंत नेण्याची प्रक्रिया आम्ही पाहिली. माझ्या पिढीला हे सारं चकित करणारं वाटलं. कालांतराने आमच्या संस्थेतील काही जणांनी या विषयात पीएच.डी. केली. गोविंद स्वरूप यांचा हसरा चेहरा आणि उत्साह. नंतर त्यांच्या दोन-तीन वेळा झालेल्या भेटीत जाणवला. मुंबई आयआयटीमध्ये ते आले असताना भेट होताच ते म्हणाले, “तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, पण वयोमानामुळे आठवत नाही.” मग मी हमीदपूरचा संदर्भ दिला. त्यांना सारं आठवलं. ते क्षण मोलाचे होते.





























































