दिव्यांग निखिलच्या प्रबळ इच्छाशक्तीला सलाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिव्यांग असूनही चमकदार कामगिरी करणारे अनेकजण आहेत. त्यांनीही परिस्थितीशी दोन हात करून यशाचे शिखर गाठले आहे. याच मार्गावर असलेल्या निखिल नावाच्या मुलाची सोशल मीडियावर चर्चा आहे.

निखिलला एक पाय नाही, मात्र त्याची जिद्द तसूभरही कमी झालेली नाही. दिव्यांगतेपेक्षा माझे स्वप्न कितीतरी मोठे असल्याचे तो सांगतो. त्याला देशासाठी पॅराऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकायचे आहे. तो जंपिंगमध्ये तरबेज आहे. एका पायाच्या जोरावार तो लाँग जम्प तसेच राऊंड जम्प करताना व्हिडीओत दिसत आहे.

मनू गुलाटी यांनी त्याचा व्हिडीओ ट्विट केला आहे. निखिलचा व्हिडीओ मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीसुद्धा त्याची दखल घेतली आहे.