पृथ्वीचा द्विशतकी शो आसामविरुद्ध 240 धावांची नाबाद खेळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वारंवार हिंदुस्थानी निवड समितीकडून दुर्लक्षील्या जाणाऱया पृथ्वी शॉने आज द्विशतकी धमाकेदार शो करीत सर्वांचेच लक्ष वेधले. त्याने आसामविरुद्धच्या रणजी सामन्याच्या पहिल्याच दिवशी 240 धावांची नाबाद खेळी करीत मुंबईला 2 बाद 397 असा धावांचा डोंगर उभारून दिला.

मुंबई आणि आसाम यांच्यात सुरू असलेल्या रणजी सामन्यात आसामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्याच अंगलट आला. सलामीला मैदानात उतरलेल्या पृथ्वीने पहिल्या सत्रापासूनच धावांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. त्याने एकाच दिवसात द्विशतक पूर्ण करून निवड समितीचे लक्ष आपल्या खेळीने वेधून घेतले आहे.

पृथ्वीने सलामीवीर मुशीर खानसोबत 123 धावांची शतकी सलामी दिली. यात मुशीरने 42 धावांचे योगदान दिले. मुशीर बाद झाल्यानंतर पृथ्वीने अरमान जाफरसोबत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान त्याने आपले शतकदेखील पूर्ण केले. मात्र अरमानने त्याची साथ 27 धावा करत सोडली. अरमान बाद झाल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे क्रिजवर आला. पृथ्वी शॉने तिसऱया सत्रापर्यंत मुंबईला 2 बाद 397 धावांपर्यंत पोहचवले होते. दरम्यान पृथ्वी शॉने आपले द्विशतकही पूर्ण केले. त्याने तब्बल 31 चौकार आणि 1 षटकार ठोकले. तिसऱया सत्रापर्यंत पृथ्वी शॉ 252 चेंडूत 218 धावा करत नाबाद होता.

द्विशतकी खेळी आणि द्विशतकी भागी

पृथ्वीने शतकी सलामीनंतर अजिंक्य रहाणेसोबत आपले द्विशतक साजरे करताना तिसऱया विकेटसाठी अभेद्य द्विशतकी भागीसुद्धा रचली. रहाणेने 140 चेंडूंत 73 धावांची नाबाद खेळी करत पृथ्वीला जोरदार साथ दिली. दोघांनी 49 षटकांत 200 धावांची नाबाद भागी केली. उद्या पृथ्वीला त्रिशतकाची तर रहाणेला शतकाची संधी आहे.