इंदू मिलमधील आंबेडकर स्मारक – वाढीव 300 कोटींच्या खर्चाला मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची 450 फुटांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता या भव्य स्मारकासाठी 1 हजार 89 कोटी 95 लाख रुपयांच्या अंदाजित खर्चास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

दादरच्या इंदू मिलमध्ये ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकाचा चबुतरा 100 फूट आणि पुतळा 350 फूट अशी स्मारकाची उंची 450 फूट ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या स्मारकासाठी पूर्वी 763 कोटी 5 लाख रुपयांच्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली होती. पण स्मारकाची उंची वाढवण्यात आल्यामुळे स्मारकाचे डिझाईनही बदलणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीत स्मारकाच्या सुधारित संकल्पनेनुसार प्रकल्पासाठी 1 हजार 89 कोटी 95 लाख रुपयांच्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.