
>> डॉ. मनीष पेंडसे
नवीन वर्ष सुरू होताना सगळ्यात प्रथम आपल्याला आठवतात ते संकल्प. निरोगी आरोग्यासाठी कोणतेही वरदान लागू पडत नाही तर त्यासाठी चांगल्या सवयी, त्यासाठी प्रयत्न आणि त्यात सातत्य राखणे आवश्य आहे. नवीन वर्ष सुरू व्हायला अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. या नव्या वर्षात अनेक जण नव्या गोष्टी करण्याचा विचार करू लागले आहेत. सध्याची लाईफस्टाईल बघता नवीन वर्षात आरोग्याच्या काही चांगल्या सवयी अंगीकारण्याचा प्रयत्न करायला हवा. या चांगल्या सवयी कोणत्या आणि त्याचे फायदे कोणते ते पाहू या.
वैयक्तिक स्वच्छता महत्त्वाची : कोविड महामारीनंतर आपल्या जीवनात स्वच्छतेचं महत्त्व फार वाढलं आहे. स्वच्छतेमध्ये केवळ घराची साफसफाई नाही, तर इतर अनेक गोष्टींच्या स्वच्छतेचाही समावेश होतो. काहीही खाताना किंवा पिताना आपण हात स्वच्छ धुतले पाहिजेत. याशिवाय तुमच्या वैयक्तिक स्वच्छतेचीही काळजी घेतली पाहिजे.
झोपेचं पा सुरळीत करा : सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे अनेकांचं झोपेचं पा बिघडलेलं आहे. उशिरा झोपणं आणि उशिरा उठणं ही चुकीची सवय अनेकांना जडलेली आहे. याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो. निरोगी शरीरासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. म्हणून दररोज सात ते आठ तासांची झोप घेतली पाहिजे.
संतुलित आहाराचे सेवन करा : वाईट सवयी सोडण्याबरोबरच चांगला आहार घेणे हेही आपल्यासाठी आवश्यक आहे. चांगल्या आहारामुळे आपण कायम निरोगी राहू शकतो आणि आपले मानसिक आरोग्यही चांगलं राहतं. प्रािढया केलेली साखर व मैद्याचे सेवन टाळा. रिफाइंड साखर आणि मैदा हे दोन्ही आरोग्यासाठी खूप घातक आहेत. बहुसंख्य लोकांना आवडणाऱ्या बहुतेक लोकप्रिय खाद्य पदार्थांमध्ये रिफाइंड साखर आणि मैदा यांचा समावेश असतो, पण या दोन पदार्थांचं रोज सेवन केलं तर आरोग्याचं नुकसान होतं.
भरपूर पाणी प्या : पाणी हा निरोगी जीवनशैलीचा महत्त्वाचा घटक मानला जातो. दररोज भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढून टाकण्यास मदत होते. तसंच शरीर हायड्रेटेड राहतं.
सािढय जीवनशैली बाळगा : शारीरिकदृष्टय़ा सािढय राहणं हे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी गरजेचं आहे. हल्ली बऱ्याच लोकांचं काम बसून असतं. मात्र खूप काळासाठी एकाच जागी बसून राहणं आणि त्यानंतर जेवून झोपणं हे आपल्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतं. शारीरिकदृष्टय़ा सािढय राहणं म्हणजे दिवसातून काही वेळ चालणं, स्ट्रेचिंग करणं तसंच सोपे व्यायाम करणं शक्य आहे.
धूम्रपान-मद्यपान सोडा : धूम्रपान आणि मद्यपान आपल्या आरोग्यासाठी घातक असतं. जर तुम्हाला कायम निरोगी राहायचं असेल तर व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे.
तणावाचं व्यवस्थापन करा : आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी तणावाचा सामना करावा लागतो. तणाव मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा आपल्याला कमकुवत बनवत जातो. त्यामुळे तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. मेडिटेशन करा, आवडते छंद जोपासा, नवीन गोष्टी शिका. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहायला मदत होईल.
(नवी मुंबई येथील मेडिकवर हॉस्पिटल्समध्ये फिजिशियन व डायबेटोलॉजिस्ट आहेत)


























































